युक्रांद राज्य अधिवेशन

२० फेब्रुवारी २०११

    स्थळ गांधीभवन पुणे

२० फेब्रुवारी रोजी युवक क्रांती दलाचे राज्यस्तरीय अधिवेशन आतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले. गांधीभवन कोथरूड येथे गांधी स्मारक निधी या संस्थेच्या आवारामध्ये संपन्न झालेल्या या अधिवेशनामध्ये पुणे, सातारा, सांगली, लातूर, बीड, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, जळगाव, मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागांमधून युक्रांदचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि समविचारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दै. लोकमतचे संपादक अनंत दिक्षित व पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. शाकीरा ईनामदार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन राज्यघटनेला अभिवादन करून झाले. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन कीर्ती गुणालेने केले. युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. युक्रांदच्या अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविकात युक्रांदच्या अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविकात युक्रांदच्या अधिवेशनाची भूमिका विशद केली. यानंतर डॉ. शाकीरा इनामदार आणि अनंत दिक्षित यांची भाषणे झाली. युवाशक्तीने आपल्या उर्जेचा वापर राष्ट्राबांधणीसाठी करावा असे आवाहन करताना डॉ. ईनामदार यांनी सदैव युक्रांदच्या कार्यास सहकार्य करू असे सांगितले.

श्री. दिक्षित यांनी आपल्या परखड विश्लेषणातून आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत युक्रांद्सारख्या चळवळीचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगीतले.त्यानंतर युक्रांदचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मेश्राम आणि दुसरे उपाध्यक्ष फिरोज अश्रफ यांची भाषणे झाली. डॉ. मेश्राम यांनी भ्रष्टाचार या विषयावरील ठराव मांडला. बाबा आमटेंच्या कार्याचे महत्व सांगताना डॉ. मेश्राम यांनी तरुणांना उदबोधक असे विचार मांडले. ते

 आनंदवनातील ट्रस्टमधील एक विश्वस्त आणि नागपूरमधील नामांकित मेंदूविकारतज्ज्ञ आहेत. फिरोज अश्रफ यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या कार्याचे महत्व सांगताना सादर केलेल्या शेरोशायरीने उपस्थितांची मने ताजीतवानी केली. फिरोज अश्रफ मूळचे युक्रांदीय. बिहारमधील राहीवासी. देशाच्या फाळणीच्या वेळी त्यांच्या वडीलानी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. बाकी नातेवाईक पाकिस्तानात गेले. पण ते भारत माझे वतन आहे म्हणून भारतातच राहिले. युक्रांदचे पुणे शहराध्यक्ष आतिक शेख यांच्या आभारप्रदर्शननाने उदघाटन सोहळा संपन्न झाला.

 खुले अधिवेशन
भोजनोत्तर सत्रामध्ये ठरावांचे वाचन व मुक्त चर्चेचा कार्यक्रम पार पडला. युक्रांदचे उपाध्यक्ष संपत साबळे, प्रा. कविता म्हेत्रे, कार्यवाह गोपाळ गुणाले, मीरा डोईफोडे, संदीप बर्वे तसेच संघटक विकास लवांडे, राजकुमार डोंबे, प्रा. पंडित तुपे या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार, शिक्षण, शेती, जिल्हावाद व पर्यावरण, आंतरराष्ट्रीय प्रश्न, दक्षिण आशियाई

 देशांमधील ऐक्य या विषयांवर ठराव मांडले. या पदाधिकाऱ्यान्बरोबरच डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, कीर्ती गुणाले, भाग्यश्री कापुरे, प्रवीण नाईक, आस्मा पठाण, श्रीराम टेकाळे हे युक्रांदीय ठराव वाचनामध्ये सूचक आणि अनुमोदक म्हणून बोलले.
ठराव वाचनाच्या कार्यक्रमानंतर मुक्त संवादाचा कार्यक्रम झाला. यामध्ये परभणीचे जुने युक्रांदीय ( त्यावेळी पूर्णवेळ कार्यकर्ते) रामराव जाधव, बीडच्या सुशीला मोराळे आणि इतर कार्यकर्त्यांची भाषणे झाली. युक्रांदचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात अधिवेशनाचा आढावा घेतला. अधिवेशनाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. रामराव जाधव, सुशीला मोराळे आणि अन्य युक्रांदियानी सत्तरच्या दशकांत युक्रांदच्या चळवळीमधून समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल अध्यक्षानी गौरवोद्‌गार काढले. रामराव जाधव यांनी युक्रांदमध्ये सक्रीय होऊन काही जबाबदारी घेण्याबाबत केलेल्या घोषणेबद्दल अध्य्क्षानी आनंद व्यक्त केला.

युक्रांदचे कार्यवाह रविंद्र धनक यांनी पूर्णवेळ लक्ष घालुन अधिवेशनातील सर्व भोजनव्यवस्था सांभाळली. कौस्तुभ बुरडे, स्वप्निल पोटे, सोमेश गीते, शंकर संकपाळ यांनी स्टेजवरील व्यवस्था पाहिली. सचिन चव्हाण, अभिजीत मंगल, संदीप गव्हाणे यांनी बैठकव्यवस्था तर श्रीराम टेकाळे, धनंजय पवार यांनी ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली.
अधिवेशनाचे सूत्रसंचालन कार्यवाह संदीप बर्वे यांनी केले. कार्यवाह गोपाळ गुणाले यांनी आभार मानले. सर्वसहमतीने ठराव करण्याचे काम अन्वर राजन आणि डॉ. ऊर्मिला सप्तर्षी यांनी पाहिले. अधिवेशनामध्ये बीडमधील धरणाग्रस्तांचा प्रश्न आणि पुणे जिल्ह्यातील रिलायन्स पाईपलाईन संदर्भात शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचे प्रश्न युक्रांदने सोडवावेत अशी विनंती करणाऱ्या प्रतिनिधींची भाषणे झाली. हे प्रश्न युक्रांदने सत्याग्रही लढा उभारून सोडवावा असा निर्णय अधिवेशनात झाला. अधिवेशनास अर्थक्रांती प्रतिष्ठान, अंधश्रध्दा
निर्मुलन समिती, शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंच, रोझरी पालक संघ, सदाचार भारती, शिवतारा गार्डन मुक्त व्यासपीठ, शांती सेना मंच या आणि इतर अनेक मित्र संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व समविचारी उपस्थित होते. युक्रांदचे संघटक प्रा. बी. डी. खरात, दिनेश गाडेकर, संभाजी चांगभले आणि कार्यालयीन चिटणीस शेषराव निसर्गंध यांनी अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

अधिवेशनात मांडले गेलेले ठराव