मुलभूत भुमिका

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपास जन्माला आलेली पहिली पिढी वीस वर्षानंतर तरुण झाली होती, वयात आली होती.  १९६२ साली चीनचे आक्रमण झाले.  भारताचा दारुण पराभव झाला.  तरुण पिढीचा मनोभंग झाला.  देशात काँग्रेसची एकमुखी व एकपक्षीय राजवट चालू होती.  विरोधी पक्ष विकलांग होते.  तरुणांनी राजकारणातली ढोंगबाजी पाहिली, सामाजिक अन्याय पाहिला.  सत्तारुढ काँग्रेस पक्षाचा ताबा सरंजामदारी शक्तीनी आणि घराणेशाहीने घेतलेला.  दलितांवर व महिलांवर घोर अन्याय होत होते.  शिक्षणक्षेत्रात अनाचार माजलेला.  निरक्षर पालकांची मुले प्रथमच महाविद्दालयात शिकू लागली होती.  पंचवार्षिक योजनांमधून सर्वांगीण विकासाचे उद्दीष्ट साध्य होण्याऐवजी विषमता वाढत होती.  श्रीमंताचा मुठभर वर्ग अधिक श्रीमंत होत होता.  कष्टकरी गरीब वर्ग शतकानुशतके दारिद्रयाच्या सापळ्यात अडकलेला.  रोजगार, अन्न, पाणी यासाठी तो हैराण होता.  सविस्तर