युक्रांदची वैशिष्ट्ये

|     भारतीय राज्यघटना व लोकशाही व्यवस्थेस सर्वोच्च प्राधान्य

|     महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत.

|     चातुर्वर्ण्य व जातीय संस्थेला आमचा ठाम विरोध, मानवता हाच खरा एकमेव धर्म असे आम्ही मानतो. प्रत्येक धर्मातील मानवतावाद आम्हास प्रिय आहे.

|     स्त्री-पुरुष समानतेला प्राधान्य देऊन ज्या देशात गावातील कुटूंबामध्ये स्त्रियांचा आदर केला जातो. तोच देश, गाव व कुटूंब प्रगती करते ह्ए सिद्ध झाले आहे.

|     सार्वत्रिक क्षेत्र, शासकीय व निमशासकीय ठिकाणी भ्रष्ट कारभारास ठाम विरोध.

|     लढाऊ अहिंसा व सामुदायिक संघर्ष, सत्याग्रह, आंदोलन, सत्याचे पाठीशी सामर्थ्य उभे करणे ही कार्यपद्धती

|     अणुबॉंब व अण्वस्त्रे ही फक्त मानवी संहाराची अस्त्रे आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्राची सुरक्षितता किंवा सामर्थ्य वाढत नाही असे युक्रांद मानते.

|     कोणतेही धार्मिक स्थळ (उदा. मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वार, मठ इ.) जाणिवपुर्वक उध्वस्त करणे म्हणजे राष्ट्राच्या विघटनास उत्तेजन देणे असे युक्रांद मानते.

|     कोणत्याही राजकीय पक्षापासून अलिप्त व स्वतंत्र एक वैशिष्ट्यपूर्णॅ राजकीय संघटन

|     संघटनेचा खर्च लोकवर्गणीतुन भाग्अवला जातो. ज्याना युक्रांदचे कार्य व विचार आवडतात त्यांच्याकडुन वर्गणी घेतली जाते.       

   मागे:युक्रांदचे ध्येय/उद्दीष्ट्ये