
युक्रांदीयाकरता आचारसंहिता /शील
1) राहणीमान स्वच्छ व निटनेटके असावे.
2) नियमीत वाचन असावे. उदा.प्रमुख वर्तमानपत्रे, मासिके, वैचारीक ग्रंथ, संतविचारधारा, राष्ट्रपुरुषांची चरित्रे इ.
3) नेहमी खरे बोलावे. ज्ञानवंत व चारित्र्यसंपन्न व्यक्तींचा सत्संग कायम ठेवावा.
4) संघटनेत व समाजातही कुणाचाही व्यक्तीगत द्वेष, मत्सर, राग नसावा.
5) व्यक्तीगत हित व प्रतिष्ठेपेक्षा संघटना हितास प्रथम प्राधान्य द्यावे.
6) संघटनेच्या मुलभूत भूमिकेशी एकनिष्ठ असले पाहिजे.
7) निर्व्यसनी असावे. (उदा. दारु, सिगारेट, गुटखा इ.) सवयी नसव्यात.
8) स्वत: निष्क्रीय राहून संघटनेच्या सक्रिय व कृतिशील कार्यकर्त्यांच्या चुका दाखवु नयेत. त्याच्यावर चारित्र्य हननात्मक टीका करु नये.संघटनेत सर्वांशी मैत्रीपुर्ण संबंध असावेत.कार्यकर्त्यांशी नेहमी सुसंवाद असावा.
9)संघटनेच्या वेळोवेळी होणार्या आपल्या परिसरातील कृती कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला पाहीजे.
10)आपला पदाचा स्वार्थी, संकुचीत, वैयक्तीक हितसंबंधासाठी वापर करु नये.
11)सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेत.
12)महाराष्ट्रभर संघटना वाढीसाठी आपआपल्या परीने प्रयत्नशील असलेच पाहीजे.
13)स्त्रीया व ज्येष्ठांबाबत विशेष आदरभाव ठेवावा.
14)प्रत्येक कार्यकर्ता निर्भीड, वैचारीक स्पष्टता असलेला, अहिंसावादी, प्रामाणिक व लढाउ वृत्तीचा असावा.