युक्रांदचे ध्येय/उद्दीष्टे
जातिमुक्त समाजरचना निर्माण करणे. जाती व्यवस्थेमुळे निरनिराळ्या
शोषणाला बळी पडलेल्या जाती व गटाना न्याय मिळवून देणे. त्यासाठी
विविध उपक्रम राबवणे.
आर्थिक
विषमता नष्ट करणे, अतिगरीब व अतिश्रीमंत यांच्यातील प्रचंड दरी कमी
करणे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या सर्व माणसाच्या
मुलभूत गरजा आहेत. त्या मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध आधिकार आहे.
त्यासाठी त्या पद्धतिची आर्थिक रचना असावी याकरिता आग्रही राहणे
स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी
सर्व नागरिकाना राज्यघटनेने दिलेले मुलभूत आधिकारांचे ज्ञान खर्या
अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहचविणॆ व ते आधिकार त्यांना बजावता
येतील यासाठी त्यांना सबल बनविणे.
या
मुद्द्यांवर आग्रह धरत सत्ता-संपत्ती व प्रतिष्ठेपासुन वंचित
असलेल्या गटाना, नागरिकानां न्याय मिळवुन देणे व त्यातुन समतेवर
आधारित शोषणमुक्त समाजरचना निर्माण करण्याचा युक्रांदचा निर्धार
आहे. संपूर्ण क्रांती करुन एक नवसामर्थ्यशाली राष्ट्र म्हणुन भारत
जगात अग्रेसर ठरावा हेच आमचे स्वप्न, यासाठी आमच्याजवळ जे जे आहे
ते आम्ही पणाला लावणार हा आमचा निर्धार आहे.
संपुर्ण क्रांती
(सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तन)
आर्थिक सामाजिक
राजकीय शैक्षणिक
सांस्कृतिक नैतिक
वैचारिक बौद्धिक