माहिती आधिकार जनजागृती अभियान
भारतिय संसदेने लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा माहितीचा आधिकार कायदा-2005 हा संमत केला. शासकिय कामात पारदर्शकता व जबाबदारी वाढवण्याचा या कायद्यामागील मुख्य उद्देश्य आहे. तो उद्देश्य सफल होण्यासाठी नागरीकाना आवश्यक ती माहिती मिळण्याचा आधिकार या कायद्याने प्रत्येक नागरीकाला प्राप्त झाला आहे. या कायद्यामुळे शासकीय कार्यालयात अनुभवास येणार्‍या लाल फितीच्या कारभारास व भ्रष्टाचारास आळा बसेल.

भारतीय राज्यघटनेतील नागरीकाना मिळणार्‍या मुलभुत आधिकारांइतकाच माहितीचा आधिकार अत्यंत मोलाचा आहे. या कायद्याची योग्य प्रकारे व परिणामकारक कार्यवाही झाल्यास जनतेच्या नियमाप्रमाणे कोणतेही काम लाच न देता व वशिला न लावता होईल. म्हणुन या कयद्याची लोकाना माहिती होणे व कायद्याचा वापर होणे आवश्यक आहे.

 जनतेमध्ये या कायद्याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी युक्रांद 'माहितीचा आधिकार कायदा 2005' प्रचार अभियान राबवत आहे. या अंतर्गत प्रचार फेरी, जाहिर सभा, मार्गदर्शन केंद्रे स्थापन करणे असे उपक्रम चालु आहेत.सध्या संपुर्ण महाराष्ट्रात 15 केंद्रे कार्यरत आहेत.

पुण्यामध्ये खालील ठिकाणी केंद्रे स्थापन झाली आहेत.

1.युक्रांद मध्यवर्ती कार्यालय 1468, सदाशिव पेठ पुणे-30

2. ऍड. किरण कदम यांचे कार्यालय 852, दत्तवाडी, विठ्ठ्ल मंदिरामागे पुणे-30

3. 1041 नविन नाना पेठ सरकारी दवाखन्यासमोर पुणे-2

मतदार जनजागृती अभियान

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान युवक क्रांती दलाने महाराष्ट्रातील आपल्या कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती अभियान राबवले. यामध्ये पुणे जिल्हा युक्रांदने सर्व तालुके, बहुंताश महाविद्यालयांमध्ये जाउन तरुणाना सच्च्या लोकप्रतिनिधीना निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे पत्रक काढुन जनतेमध्ये ते वाटण्यात आले. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये मुख्यत्वे करुन पुणे, माढा (सोलापुर), म्हसवड (सातारा), गंगाखेड (परभणी), कर्जत (अहमदनगर), जेजुरी, जालना इ. ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला.