शिक्षणसेवकांचे जिल्हावादविरोधी आंदोलन

महाराष्ट्र शासनाने शिक्षणसेवक पदासाठी २०१० मध्ये परीक्षा घेतल्या होत्या. त्या परीक्षेमध्ये अडीच लाख परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी १४७०० गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षणसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली. या गुणवत्ता यादीत संपूर्ण राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तरुण होते.सविस्तर

संपुर्ण दारुबंदी आंदोलन

होय! संपुर्ण दारुबंदी शक्य आहे.लोकशाहीत जनतेची तीव्र ईच्छाशक्ती असल्यास लोककल्याणकारी शासनास निर्णय घ्यावाच लागेल.भारतीय राज्यघटनेतील कलम 47(4) या मार्गदर्शक तत्वानुसार नशाबंदीबाबतचे निर्णय घेण्याच्या सुचना व आधिकार प्रत्येक राज्यशासनास दिलेले आहेत.त्यानुसार महाराष्ट्रात हा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.सविस्तर

 

फी वाढ विरोधी आंदोलन ( पुणे विद्यापीठ )

पार्श्वभुमी जून 1969 मध्ये अचानक पुण्यामधील शिक्षणसंस्थानी 100 रुपये फी वाढ केली. (सध्याच्या काळानुसार 3000 रुपये ) या सगळ्या शिक्षणसंस्था राष्ट्रीय शिक्षणसंस्थांच्या ताब्यात होत्या. या फी वाढीमुळे समाजातिल आर्थीकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर कॉलेज शिक्षण सोडण्याची पाळी येणार होती. युक्रांदची स्थापना नुकतिच झाली होती. तिची नाळ ग्रामीण व ब्राम्हणेतर विद्यार्थ्यांशी जोडली होती.त्यामुळे युक्रांदने अग्रहक्काने हा प्रश्न घ्यायचे ठरवले. डॉ. कुमार सप्तर्षी यांचा नुकताच आंतरजातिय विवाह झाला होता. त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी होत्या. त्या बाजुला ठेवुन त्यानी चळवळीत झोकुन द्यायचे ठरवले. सविस्तर