युक्रांद केंद्रासाठी किमान कृतिकार्यक्रम
 

Ø      युक्रांदच्या साप्ताहिक बैठका होणे आवश्यक. त्यामध्ये आपला परिसर, राज्य व देश यांच्या पातळीवरील विविध घडामोडी, विविध प्रश्नांवर चर्चा करुन कृतीकार्यक्रम आखावा

Øकेंद्र ज्या गावात/तालुक्यात/शहरात आहे.तेथील सर्वप्रकारची राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. माहिती गोळा करणे.

Øसध्याचे कार्यरत राजकीय पक्ष, इतर संघटना, प्रमुख कार्यकर्ते, पोलीस महसुल, विकास आधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, पदाधिकारी, आधिकारी, त्यांची कार्यालये, फोन, नांवे माहित असावीत.

Øआपण राहतो त्या परिसरातील प्रमुख प्रश्नांचा शोध घेऊन त्याबाबत सर्व अभ्यास करणे, जनजागृती करुन त्याबाबत बैठक, पत्रकार परिषद, सत्याग्रह, आंदोलन इ. करता येईल का? याचा प्रयत्न करावा.

Øराज्य युक्रांद कार्यालयाशी वेळोवेळी फोन, पत्राद्वारे संपर्कात असावे.वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.

Øआपल्या परिसरातील आकस्मिक दु:खद घटना, अन्यायग्रस्ताना भेटी द्याव्यात. शक्य ते मदतकार्य करण्याचा मनापासुन प्रयत्न करावा.आनंदाच्या घटना व कार्यक्रमास देखील उपस्थीत राहावे.

Øदर आठवड्याला तालुक्याच्या/शहराच्या प्रमुख सरकारी कार्यालयात नियमीत संपर्कात राहावे. व तेथील कामकाज समजुन घ्यावे. उदा. पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय, सहकारी संस्था, कार्यालये, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालीका, महानगरपालीका इत्यादी.

Ø      राष्ट्रीय सण साजरे करण्यात पुढाकार घ्यावा. त्यादिवशी व्याख्याने, परिसंवाद, निबंधस्पर्धा, युवक मेळावे, महिला मेळावे, शेतकरी मेळावे घेउन त्याना आवश्यक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. किंवा अन्य सामाजिक उपक्रम घ्यावेत.अशा उपक्रमाना सरकारी आधिकारी निमंत्रीत करावेत.

Øआपल्या परिसरातील महिला बचत गट, युवक मंडळाना नियमीत भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात.

Øसेंद्रिय व निसर्ग शेतीचा स्वत: अभ्यास करुन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेऊन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी.

Øग्रामसभेचे आधिकार समजुन घेऊन ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा.ग्रामसभा होत नसतील तर जि.प./पं. समितीच्या सहकार्‍याने ग्रामसभा घेण्यास सरपंच/ग्रामसेवकाना भाग पाडा.

Øआपल्या युक्रांद केंद्राचा नामफलक गावाच्या/शहराच्या प्रमुख ठिकाणी लावावा.

Øआपल्या परिसरातील समाजप्रेमी शासकीय व खासगी डॉक्टरांच्या साह्याने आरोग्य शिबीरे घ्यावीत.

Øमाहितीच्या आधिकाराचा अभ्यास करुन स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था व अन्य शासकीय कार्यालयातून निरनिराळ्या विकासकामांची, योजनांची माहिती गोळा करावी.त्यात आर्थिक गैरव्यवहार आढळला तर पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पातळीवर चौकशीची व कायदेशीर कारवाईची मागणी करावी.

Øआपल्या परिसरात स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धेच्या विरोधी बालविवाह रोखणे, जाती धर्म सलोखा रहावा याकरिता सतत जाहीरपणे बोलत रहावे.गरज भासल्यास पत्रके छापुन वाटावीत.बैठका, सभांचे आयोजन करावे.

Øवेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात मतदारांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाच पाहीजे.आपला उमेदवार उभा नसल्यास अन्य चांगल्या व लोकशाही मानणार्‍या उमेदवाराच्या (स्थानिक परिस्थीतीचा अभ्यास करुन ) राज्य युक्रांदच्या सल्ल्याने प्रचार कार्यात सक्रिय असावे.

Øसत्याग्रही विचारधारा मासिकात युक्रांदवृत्तकरीता आपल्या केंद्राने केलेल्या कृतीकार्यक्रमांची माहिती दरमहा पाठवावी. मासिकाचे वर्गणीदार करावेत.

Ø      युक्रांदच्या कोणत्याही कार्यक्रम नियोजनासाठी व खर्चासाठी स्वाभिमानाने लोकवर्गणी करणॆ (आपले काम व विचार माहित असलेल्या तसेच समविचारी लोकांकडुन वर्गणी मिळत असते.हा जुना व सार्वत्रीक अनुभव आहे.)

Ø      लोकांच्या सहभागातुन, लोकांच्या प्रश्नावर अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने संघर्ष व आंदोलन करावे.आवश्यकता पडल्यास शांततामय सत्याग्रह करुन तुरुंगात् जाण्याची तयारी ठेवावी.याबाबत युक्रांदच्या पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन घ्यावे.

मागे:युक्रांदीयाकरता आचारसंहिता                     पुढे:राज्यघटना प्रास्ताविक